Ad will apear here
Next
दूध, दही पनीरचे पदार्थ, पौष्टिक पदार्थ
आपल्या रोजच्या जेवणात दूध, दही असायलाच हवे, असे म्हटले जाते; पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. मग काय करायचे... मग या दोन्ही पुस्तकांतील पदार्थ करून बघा. पहिल्या पुस्तकात निर्मला रहाळकर यांनी विविध प्रकारच्या खिरी बनवायला शिकवले आहे.

बंगाली पदार्थ किंवा पनीर पकोडे, मसालासारखे पनीरचे पदार्थ, चीजचे पदार्थ, बर्फीसारखे खव्याचे पदार्थ, ताकातल्या भाज्यांसह दह्याचे पदार्थ आणि खरवस, दहीवड्यासारख्या पदार्थांच्या कृतीही सांगितल्या आहेत.

दुसऱ्या पुस्तकात प्राजक्ता पावनगडकर यांनी वाढत्या वयाच्या मुलांसाठी पौष्टिक पदार्थ सांगितले आहेत. त्यात तिखट पदार्थांमध्ये कबाब, कटलेट, विविध उसळी, पराठे शिकवले आहेत. शिवाय रोल्स, वड्या, कोशिंबीर, सँडविचही शिकायला मिळते. गोड पदार्थांमध्ये पुऱ्या, वड्या, खीर, लाडू, हलव्याच्या कृतींचा समावेश आहे. 

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : १६८
किंमत : १३५ रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZZOBI
Similar Posts
शंभर पक्वान्ने + दूध दही पनीरचे पदार्थ जेवण झाल्यावर गोड पदार्थ खायला अनेकांना आवडतात. त्यातही नाना प्रकार हवेतच. त्यासाठी विदुला साठे यांनी गोडाच्या विविध प्रकारांच्या कृती दिल्या आहेत.
ज्येष्ठांचा आहार ‘ज्येष्ठांचा आहार’ या पुस्तकात निर्मला राहळकर आणि डॉ. अभिजित म्हाळंक यांनी आयुर्वेदानुसार मार्गदर्शन केले आहे. प्रारंभी आहार व प्रकृती यांचा संबंध जोडून आहार आणि स्वभावावरही चर्चा केली आहे. त्यानंतर ज्येष्ठांसाठी उपयुक्त ठरतील अशा पाककृती सांगितल्या आहेत. न्याहारीचे पदार्थ, सूप, गोड पदार्थ या विभागांबरोबरच
जिन्नस परदेशी लज्जत स्वदेशी किनवा ब्रेकफास्ट, हॅश ब्राउन्स भरीत, कॉर्न सालसा, कॉर्नमील इडली, मॉंगो पाय, फिलो रोल्स, गार्लिक पिटा, मसाला वॉफल्स, टॉर्टिया बेक, कुसकुस खिचडी, मार्शमेलो डिलाइट.... ही कसली नावे, असे वाटतेय का? आजचा जमाना स्वदेशी नि परदेशी यांच्या फ्युजनचा जमाना आहे. मग आपले खाणेही असे फ्युजन का नको? वसुंधरा पर्वते यांनी अशी फ्युजन डिश आपल्यासमोर पेश केली आहे
झटपट बनवा केवळ काही मिनिटांत बनणाऱ्या उपवासाच्या आणि विविध प्रांतातल्या हटके पाककृती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. प्रभा प्रभुणे यांच्या या पुस्तकाच्या पहिल्या विभागात विविध प्रकारची पेये दिली आहेत. नेहमीच्या सरबतांबरोबरच तुळशीच्या बियांच्या सरबतासारखे वेगळे प्रकारही आहेत. लोणची, चटणी, रायते, कोशिंबिरी, सार असा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language